breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

डोंबिवलीत पुन्हा स्फोट, एमआयडीसीच्या फेज-२ मध्ये एका कंपनीला भीषण आग

Dombivli Fire | डोंबिवली एमआयडीसीतील आणखी एका कारखान्यात स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे कारखान्याला मोठी आग लागली आहे. या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. कारखान्यात स्फोटांची मालिका चालू असून परिसरात घबराट पसरली आहे.

डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मधील मालदे आणि इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट झाल्यानंतर ही आग लागली आहे. आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ठाणे आणि कल्याण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. पाण्याचे टँकर उभे आहेत. युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरु आहे. कंपनीमध्ये काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा    –      अजितदादांना सोबत घेत भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली; संघाने भाजप नेत्यांना सुनावले खडेबोल 

https://x.com/Rajmajiofficial/status/1800765120802414632

डोंबिवली एमआयडीसीतील आगीची दुर्घटना दुर्दैवी आहे. या परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यांना तातडीने घरी पाठविण्यात आले आहे. तर या परिसरातील इतर कंपन्यांमधील कामगारांना पण बाहेर काढण्यात आले आहे. या स्फोटामुळे कंपनीच्या बाहेरील वाहनांचे नुकसान झाले आहे. तातडीने हा परिसर मोकळा करण्यात आला आहे. धुराचे लोट सर्वदूर दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button