“मी एखाद्याला चॅलेंज दिल की कुणाच्या बापाचं ऐकत नाही”; अजित पवारांची चैफेर फटकेबाजी
![Ajit Pawar said that I don't listen to someone's father when I give a challenge to someone](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/ajit-pawar-1-780x470.jpg)
बारामतीत राष्ट्रावादी कॉग्रेसचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे का?
नागपूर :
काही दिवसांपुर्वी पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत राष्ट्रावादी कॉग्रेसचं घड्याळ बंद पाडू असं थेट आव्हान दिलं होतं. या घोषणेचा विरोधीकपक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
सप्टेंबर महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आपले एक नेते माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार असं काहीजण बोलतात. बारामती आमचं गाव आहे, ते शक्य नाही. मी मनात आणलं, तर मीच तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल, असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्राला माहिती आहे मी एखाद्याला चॅलेंज दिल की च्या आयला…तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही, हे पण खरं आहे. त्यांना म्हणावं जरा दमानं. फार फास्ट गाडी चालली, फास्ट गाडीचा कधी अपघात होईल आणि कोलमडून पडाल सांगता येणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.