जरांगेंकडून उपचार घेण्यास होकार, मराठा समाजाकडून आज ‘चक्काजाम’ आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Untitled-design-7-2-780x470.jpg)
Manoj Jarange Patil Health Update : उपोषणामुळे गुरुवारी मनोज जरांगे पाटीलांची तब्येत खूप खालावली होती. मनोज जरांगे पाटील उपचार घेत नसल्याने राज्य सरकारने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंनी उपचार घेण्यास होकार दिला आहे. जरांगेनी गुरुवारी त्यांचे सहकारी आणि डॉक्टरांच्या विनंतीवरुन स्वतः वरील उपचारांना होकार दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार जालना जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांच्या देखरेखीखाली त्यांना सलाईन लावण्यात आलं. मनोज जरांगेंनी १० फेब्रुवारीपासून उपोषण आंदोलन सुरु केलं होतं. पण गुरुवारी त्यांची तब्येत जास्त बिघडली. अशक्तपणामुळे जरांगेंना ग्लानी आली. जरांगेंना पाणीही घोटवत नव्हतं. एवढं असतानाही जरांगे उपचार आणि पाणी घेण्यास मनाई करत होते, त्यामुळे राज्य सरकारने कोर्टात तक्रार दिली. यानंतर न्यायालयाने जरांगेंना उपचार घेण्याचे आदेश दिले.
हेही वाचा – ‘लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. नांदेड-हिंगोली, परभणीसह विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.