डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्या प्रवेश मार्गदर्शन सत्र
विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत सखोल माहिती देणारं व्याख्यान

पिंपरी-चिंचवड : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी येथे शनिवार, १२ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता शांताई सभागृहात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात विद्यार्थ्यांना व पालकांना प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे, शाखा निवडीची पद्धत, कागदपत्रांची पूर्तता, ऑप्शन फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी, तसेच प्राधान्यक्रम निश्चित करताना विचारात घ्यावयाचे निकष याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या सत्रात, नामांकित करिअर मार्गदर्शक प्रा. केदार टाकळकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांनी आजवर हजारो विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवली असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा उपस्थितांना होणार आहे.
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचे नियोजन
विद्यार्थी- पालकांनी लाभ घ्यावा…
या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे चेअरमन मा. सतेज पाटील, प्रतिष्ठानचे विश्वस्त मा. तेजस पाटील, संकुलाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त), महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. पी. मालती आणि प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. संदीप सरनोबत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांनी, पालकांनी व शिक्षकांनी या उपयुक्त मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्या डॉ. सौ. पी. मालती आणि महाविद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कुठे आणि कधी?
स्थळ: शांताई सभागृह, डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी, पुणे
दिनांक व वेळ: शनिवार, १२ जुलै २०२५ | सकाळी १०:३० वाजता
संपर्क: डॉ. सौ. मनीषा तनवर – ९८८१०६०९१२
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




