breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबई

अभिनेता अमित मेहता यांची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री

‘लव्ह यू लोकतंत्र’ चित्रपटाला दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांची पसंती

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

‘लव्ह यू लोकतंत्र’ हा चित्रपट 14 ऑक्टोंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या सिनेमातून अभिनेता अमित मेहता यांनी बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. त्यांच्या अभिनयाचं सर्वत्र कैतुक केले जात आहे. हा सिनेमा अभय निहलानी यांनी दिग्दर्शित केला आहे.

‘लव्ह यू लोकतंत्र’ या सिनेमाची वास्तववादी कथा अशी मांडणी आहे. हा आजच्या राजकीय गोंधळावर भाष्य करणारा असा एक विषय आहे. या चित्रपटात ईशा कोप्पीकर, रवी किशन, अमित मेहता, मनोज जोशी, स्नेहा उल्लाल, अली असगर, कृष्णा अभिषेक आणि सपना चौधरी हे महत्वापूर्ण भूमिकेत आहेत.

लव्ह यू लोकतंत्र या चित्रपटात अभिनेता अमित मेहता यांनी अप्रतिम अभिनय केला आहे. त्यांचा हा बॉलिवूडमधईल पहिला सिनेमा आहे. अमित मेहता यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यातही धुमाकुळ घालत आहे.

सोबतच, या चित्रपटात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गाणे गायले आहे. अमृता फडणवीस यांनी या गाण्यासह बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. सोबतच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान यांच्यासोबत अमृता फडणवीस यांनी ‘धडका दिल’ हे गाणं गायलं आहे. या चित्रपटातील ‘धडका दिल’ या गाण्याची सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button