पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशी; नांदेडच्या भोकर जिल्हा न्यायालयाचा निकाल
![Accused of raping five-year-old Chimurdi hanged; Judgment of Bhokar District Court of Nanded](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Hammer-1.jpg)
पुणे |
पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीला नांदेडच्या भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथे चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी आरोपी बाबुराव माळेगावकर याला फाशीची शिक्षा सुनावली. भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथे एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना २० जानेवारीला घडली होती.
याबाबत आरोपी बाबुराव सांगेराव ऊर्फ बाबुराव माळेगावकर उकंडु विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, साक्षीदाराचे साक्ष पुरावे, वैद्यकीय पुरावा व आरोपीविरूद्ध सबळ पुरावे याआधारे आरोपी बाबुराव माळेगावकर यास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकार तर्फे अॅड.रमेश राजुरकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.स्वप्नील कुलकर्णी, अँड सलीम शेख यांनी मदत केली. सदरील निकालानंतर दिवशी (बु.) येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
वाचा- गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का? जयंत पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…