पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मालवाहू कोंबड्यांच्या टेम्पोला अपघात, शेकडो कोंबड्यांचा मृत्यू
![Pune-Mumbai Expressway, cargo chickens, Tempola accident, death of hundreds of chickens,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Chicken-780x470.png)
पुणे : मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गहूंजे गावाजवळ मालवाहू कोंबड्यांच्या टेम्पोला अपघात झाला. यात शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. तर चालकासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुचल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गहूंजे गावाजवळ मालवाहू कोंबड्यांच्या टेम्पोला अपघात झाला. यात शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. तर चालकासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुचल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कोंबड्यांनी भरलेला मालवाहू टेम्पो पुण्यावरून मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईकडे जात होता. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील गहूंजे गावाजवळ टेम्पो आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी टेम्पोला भीषण अपघात झाला.
या अपघातात टेम्पोमध्ये असलेल्या शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे व्यावयासिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अपघातात टेम्पो चालकासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.