Pune : पुणे-मुंबई महामार्गावर एलपीजी गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी
![A tanker carrying LPG gas overturned on the Pune-Mumbai highway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Nigdi-780x470.jpg)
निगडी : पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या टँकचा अपघात झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एलपीजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला आहे. याचा वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (निगडी) भक्ती-शक्ती उड्डाणपूल उतरताच एलपीजी गॅसच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. टँकर पलटी झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली असून यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘ईव्हीएम मशीनची पूर्ण प्रक्रिया पारदर्शक’; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती
दरम्यान, काही दिवसांपुर्वी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर केमिकलचा टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत पाचजणांचा जळून मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये अशी दुर्घटना होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.