पुण्यातील खडकवासला परिसरात जमावाचा धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला, व्हिडीओ व्हायरल
Pune Crime News | पुण्यातील गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही आहे. त्यातच पुण्यातील खडकवासला भागातून एक घटना समोर आली आहे. यात काही गुंडांनी राडा केल्याचं दिसत आहे. या गुंडानी काही लोकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेचा सीसीटीव्हीदेखील समोर आला आहे.
पुण्यातील खडकवासला भागातून ही घटना समोर आली आहे. यात काही गुंडांनी पुन्हा राडा केल्याचं दिसत आहे. या गुंडानी काही लोकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला आहे. ही घटना गोऱ्हे बुद्रुक गावातील असल्याचं सांगण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात १०-१२ जणांच्या टोळक्याने कोयते-तलवारीने ३ जणांवर हल्ला केला असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा – नितीन गडकरी आचारसंहितेपूर्वी देणार मोठे धक्के
पुण्यातील खडकवासला भागातून ही घटना समोर आली आहे. यात काही गुंडांनी राडा केल्याचं दिसत आहे. या गुंडानी काही लोकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला आहे. pic.twitter.com/MG349x3QiQ
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) March 7, 2024
विशेष म्हणजे हा हल्ला भररस्त्यात करण्यात आला आहे. रस्त्यावर इतर लोकांची ये-जा सुरू आहे. मात्र, गुंडांना याची कसलीही भीती दिसली नाही. या टोळक्याने धावत येत दुचाकी अडवली आणि त्यानंतर गाडीवरील तरुणांवर कोयता आणि तलवारीने वार करत त्यांनी जखमी केलं असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.