बैलगाडा मालकाचा नादच खुळा..! चक्क फॉर्च्युनरमधून आणली घोडी
पुणे : पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे बैलांची देखील तेवढीच काळजी घेतली जाते. मात्र बैला बरोबरच त्याच्या बरोबरीने महत्त्व आहे. बैलगाड्या पुढे पळताना घोडीला ठेवावेच लागते. कारण बैलांना रस्ता दाखवण्यासाठी आणि बैलांपेक्षा घोडीचा वेग अधिक असतो. त्यामुळे घोडीला देखील तेवढेच महत्त्व आहे.
शिरूर तालुक्यातील ढोक सांगवी गावच्या एका हौशी तरुणाने पाच महिन्यांची एक घोडी २५ हजाराना विकत घेतली. त्या घोडीला चक्क फॉर्च्युनर कार मधून आणले आहे. या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – महाविकास आघाडीत बिघाडी? पुणे लोकसभा जागेवरून अजित पावारांचं मोठं विधान
किरण दगडु पाचांगे यांनी अहमदनगर जिल्ह्यातून एक पाच महिन्यांची असलेली घोडी विका घेतली. पांचागे हे बैलगाडा शौकीन आहेत. त्यांचा स्वतःचा बैलगाडा देखील आहे. त्यामुळे गाद्याच्या पुढे धावण्यासाठी ही घोडी विकत घेतल्याचे पाचंगे यांनी सांगितले आहे.