TOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

24 तासांत 8,503 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 7,678 जण कोरोनामुक्त

पुणे  | गेल्या 24 तासांत देशभरात 8 हजार 503 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर, 7 हजार 678 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 46 लाख 74 हजार 744 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 41 लाख 05 हजार 066 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 98.36 टक्के एवढा झाला आहे.देशात सध्या 94 हजार 943 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 624 रुग्ण दगावले असून, देशात आजवर 4 लाख 74 हजार 735 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.37 टक्के एवढा झाला आहे.

देशात आतापर्यंत 65.32 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच, कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 131.18 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button