प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता दहावी बोर्डाचा निकाल

SSC Result Date 2025 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. उद्या, मंगळवार, १३ मे रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी ही मोठी बातमी आहे, कारण गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटलाअसताना दहावीचा निकाल वाढणार की घटणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Virat Kohli Retirement | विराट कोहलीने घेतला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय
या वेबसाइटवर पाहता येईल निकाल
1. http://www.mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org
3. https://ssc.mahresults.org.in