breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

दहावीची परीक्षा आजपासून; १६ लाख विद्यार्थ्यी सज्ज

मुंबई : राज्यात दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरूवात होत आहे. सर्वत्र परीक्षेचे वातावरण बघायला मिळतंय. .यंदा राज्यभरातून तब्बल १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थी देणार परीक्षा देणार आहेत. हा आकडा खरोखरच खूप जास्त मोठाच म्हणावा लागणार आहे. ही परीक्षा ९ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणार आहे. ६ हजार ८६ केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक मंडळ देखील सज्ज झाल्याचे बघायला मिळतंय. या परीक्षेची जय्यत तयारी देखील सुरू आहे. दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाल्याचे मंडळाकडून सांगण्यात आलंय. राज्यभरात या परीक्षेसाठी कर्मचारी देखील तैनात केले जाणार आहेत. नुकताच दहावीच्या परीक्षेबद्दल महत्वाची माहिती देण्यात आलीये. शरद गोसावी ,अध्यक्ष राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून महत्वाची माहिती ही देण्यात आली.

हेही वाचा – ‘रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजप लढवणार’; नारायण राणेंचं ट्वीट चर्चेत

१ मार्च ते २६ मार्च दरम्यान दहावी बोर्डची परीक्षा पार पडतंय. विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक देखील करण्यात आलीये. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना काही नियम देखील पाळणे आवश्यक आहे.

यंदाचे दहावी बोर्डचे पेपर हे दोन सत्रात पार पाडणार आहेत. सकाळच्या सत्रात ११ वाजता तर दुपारी ३ वाजता सुरू पेपर सुरू होतील. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई होणार होणार आहे. यामुळे मंडळाकडून सांगण्यात आलंय की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून नये.

राज्यभरातून यंदा ५६ ट्रान्सजेंडर देखील १० वी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. कॉपी मुक्त परिक्षेसाठी राज्यभरात २७१ भरारी पथक कार्यरत करण्यात आली आहेत. ही पथक परीक्षा केंद्रांवर भेट देतील. जर कोणीही गैरप्रकार करताना आढळले तर यांच्यावर कारवाई करणार. ही परीक्षा देखील काॅपी मुक्त करण्यासाठी बोर्डाचे प्रयत्न आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button