breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

1 जानेवारी पासून विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी…दोन रुपयांची फाडावी लागणार पावती…

पंढरपूर | महाईन्यूज |

नवीन वर्षापासून पंढपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. भाविकांचे मोबाईल ठेवण्यासाठी लॉकरची व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे.भाविकांच्या विरोधानंतरही उद्यापासून म्हणजेच 1 जानेवारी पासून विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांचे जवळपास लाखभर मोबाईल ठेवता येतील अशा अडीच हजार लॉकरची व्यवस्था मंदिर समितीने उभारली आहे.

मोबाईल ठेवल्यावर भाविकाला पावती दिली जाणार असून यासाठी प्रति मोबाईल दोन रुपये सेवा शुल्क द्यावा लागणार आहे. दर्शनाला कितीही वेळ लागला तरी पुन्हा मोबाईल घेताना त्याला वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही. यात्रा काळात देवाच्या दर्शनाला 18 ते 20 तासांपर्यंत वेळ लागत असल्याने ही सुविधा समितीने दिली आहे. नवीन वर्षाचे पहिले काही दिवस संपल्यावर पुन्हा गर्दीचा ओघ कमी होणार असल्याने समितीला या व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या दूर करता येणार आहेत. मात्र मोबाईल ठेवण्यासाठी आपले ओळखपत्र आवश्यक असणार असून त्याशिवाय भाविकाला मोबाईल ठेवता येणार नाहीत.

मंदिर समितीने पूर्वी सुरक्षेच्या कारणावरून मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मोबाईल लॉकरच्या नावाने पैसे वसूल करण्यात येत असल्याचे आरोप झाले होते. या प्रकाराविरोधात वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी आवाज उठविल्यावर मंदिरातील मोबाईल बंदी उठविण्यात आली होती. आता ही बंदी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो पर्यटक पंढरीत दाखल झाले असून विठ्ठल मंदिराची दर्शन रांग चंद्रभागेच्या पात्रापर्यंत पोचली आहे. या भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर समितीच्या नवीन भक्तनिवासात फुले आणि फुग्यांच्या साहाय्याने आकर्षक सजावटीचे काम सुरू आहे. सर्व भक्त निवास इमारती पर्यटकांनी ओव्हरपॅक झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button