breaking-newsमहाराष्ट्र

११ वर्षांच्या मुलासमोरच पत्नीचा गळा चिरुन पतीची आत्महत्या

महाबळेश्वर येथे फिरायला गेलेल्या दाम्पत्यामध्ये भांडण झाल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पतीनेही आत्महत्या केली असून ही सर्व घटना त्यांच्या ११ वर्षांच्या मुलाच्या डोळ्यादेखतच घडली आहे. त्यानेच या घटनेची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना आणि हा प्रकार उघड झाला.

पुण्यातील विश्रांतवाडी येथे राहणारे अनिल शिंदे त्यांची पत्नी सीमा आणि मुलगा आदित्य याच्यासह महाबळेश्वरमध्ये फिरायला गेले होते. ५ डिसेंबर रोजी ते महाबळेश्वरमधील एका हॉटेलमध्ये उतरले. रात्री एकच्या सुमारास अनिल आणि सीमा यांच्यात वाद झाला. या भांडणामुळे संतापलेल्या अनिलने सीमा यांच्यावर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली. यानंतर अनिलनेही आत्महत्या केली. हॉटेलच्या खोलीतच हा सर्व प्रकार घडला. त्याच खोलीत त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा आदित्यही होता. आदित्यने आईला हाक मारली. पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकाराने घाबरलेल्या आदित्यने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनीच या घटनेची माहिती महाबळेश्वर पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोघांमध्ये नेमका कशावरुन वाद झाला होता, याचा पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button