breaking-newsमहाराष्ट्र

१०० कोटींची तोकडी मदत,सरकारवर फडणवीसांची टीका

मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा महाविकासआघाडीवर टीका केली आहे. निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्याचं जे नुकसान झालं त्याकर जाहीर केलेली १०० कोटींची मदत ही तोकडी आहे. नुकसान प्रचंड मोठं आहे, तेव्हा आणखी मदत करणे आवश्यक असल्याचं यावेळी फडणवीसांनी सांगितलं. 

गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात पूर आला तेव्हा कोकणात – नाशिकमध्येही नुकसान झालं होतो. तेव्हा आम्ही विशेष जीआर काढून एनडीआरएफ पेक्षा जास्त मदत देण्याचे निर्णय घेतले होते.

सांगली – कोल्हापूरसाठी आपण ४७०८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं होतं. कोकण नाशिक करता २१०५ कोटी रुपयांचे पॅकेज दिलं होतं. आताच्या सरकारनेही अशीच मदत जाहीर करणे आवश्यक आहे. 

छोटे व्यवसायिक ,बारा बलुतेदार यांच्यासाठी मदत आम्ही सत्तेत असतांना जाहीर केली होती. घर नुकसानबाबत एनडीआरएफचे येणारे पैसे आणि वेगळी मदत अशी जाहीर केली होती. तसेच ३ पटीने पैसे वाढवून मदत जाहीर केली होती, शेतकऱ्यांचे चालू कर्ज माफ केलं करण्याचा निर्णय आम्ही गेल्या वर्षी घेतला होता, असं सांगत फडणवीसांना तुलना केली आहे. 

मोदी सरकारला आता दोन वर्षे झाले आहेत. मोदी सरकारने गेल्या वर्षभरात कठोर निर्णय घेतले आहेत. जे आयुष्यात कधी पाहू शकलो नसतो असे निर्णय पंतप्रधान यांनी घेतले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button