breaking-newsपुणेमहाराष्ट्र

हेल्थ कॉन्शसनेसमुळे दुग्ध उत्पादनांवर संक्रांत

  • ही वर्षापूर्वी आम्हाला तुप आणि बटर स्टॉक इतर ठिकाणाहून मागवावा लागत होता. पण आता परिस्थिती उलटी झाली आहे. आज राज्यातील खासगी व सहकारी दुधांकडे तब्बल एक हजार कोटी रुपयांचे बटर आणि तुप पडून आहे. त्याची विक्री लवकर झाली नाही तर हे नुकसान सोसावे लागणार आहे.
    -दशरथ माने, संचालक, सोनाई दुध उद्योग समूह.

 

पुणे – सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढणाऱ्या हेल्थ कॉन्शसमुळे सहकारी व खासगी दूध सघांच्या विविध उत्पादनांवर संक्रांत आली आहे. विशेषत: तुप आणि बटर यांच्या मागणीमध्ये प्रचंड घट झाली आहे. दुधाचे घटलेले दर आणि दुग्धजन्य पदार्थाची कमी झालेली मागणी आदी कारणामुळे डेअरी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्यातील प्रमुख खासगी व सहकारी दूध संघाच्या संचालकांची बैठक झाली. या बैठकीत सर्वच संचालकांनी दूध संघ कशा प्रकारे आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत, याची विस्तृत माहिती दिली. सध्या दूध संघाना सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे दूध पावडर पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर पटल्याने लाखो टन पावडर पडून आहे. त्यामुळे आता दुसरा स्त्रोत म्हणजे दुग्धजन्य पदार्थांची होणारी विक्री त्यात विशेष करुन तुप आणि बटर याच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे दूध संघाच्या दृष्टीने फायदेशीर ठरत असते. पण सध्या या दोन्ही उत्पादनांच्या विक्रीमध्ये घट झाली आहे.

दूध संघाचे आर्थिक गणित हे बहुतांशी दुग्धजन्य पदार्थावरच अवलंबून असते. त्यामुळे हे दुग्धजन्य पदार्थ जेवढे जास्त खपतील तेवढा दूध संघाना फायदा होत असतो. दूध संघांकडे जेवढे दूध जमा होते. त्यातील चाळीस टक्‍के दूध प्रक्रिया करुन पिशवीतून विकले जाते. तर उर्वरित साठ टक्‍के दूधाची उत्पादने तयार करुन त्यांची विक्री केली जाते. पिशवीतून विक्री होणारे दुधाचे उत्पन्न हे बहुतांशी शेतकऱ्यांना जाते. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थातून होणारी विक्री हाच दुध संघाचा नफा असतो. पण हीच विक्री घटल्याने अडचण निर्माण झाली आहे.

बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यात तुप आणि बटर याला पूर्वी ज्याप्रमाणे मागणी होती. ती आता कमी झाली आहे.साधारणत; काही वर्षापूर्वी महिन्याच्या किराणा सामानाच्या यादीत साजूक तुपाची मागणी होत होती. पण आता ती कमी झाली असल्याचे काही दूध संघांच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा सध्याच्या जमान्यात नागरिक खूपच हेल्थ कॉन्शस झाले आहे. दुग्धजन्य पदार्थ खाल्याने स्थूलपणा वाढतो. शरीरातील फॅटस्‌ वाढून त्याचा तब्बेतीवर परिणाम होतो, असे वैद्यकीय क्षेत्रातून सतत सांगण्यात येत आहे. त्याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. तुपाचा खप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. बटर तर अगदी काही घरात वेगळा बेत असले तरच ग्राहक घेऊन जात असल्याने त्याची विक्री सुद्धा कमी झाली आहे.

विक्रीअभावी तुप आणि बटर याचा मोठा साठा दूध संघाकडे पडून आहे. त्याचबरोबर त्याला सहा महिन्यांची मुदत असल्याने सुद्धा मोठी अडचण येत आहे. त्यामुळे सहा महिन्यांत त्याची विक्री झाली पाहिजे. पण तसे झाले नाही तर हा साठा फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे आता बटर आणि तुपाची विक्री वाढविणे आणि पूर्वीसारखी त्याला बाजारपेठ मिळवून देणे हाच एक पर्याय सर्व दूध संघापुढे आहे. त्यामुळे आगामी काळात आता याबाबत लवकर मार्केटिंगचा नवीन फंडा शोधण्याचा मार्ग डेअरी असोसिएशन राबविणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button