breaking-newsमहाराष्ट्र

हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

हिंगोली : पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने आज शनिवारी दुपारच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना पोलिस मुख्यालयात घडली. या घटनेमुळं हिंगोली पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

हिंगोली पोलिस दलातील शस्त्रास्त्र दुरुस्ती विभागात कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी जितेंद्र साळी यांनी आज, शनिवारी दुपारी पोलीस मुख्यालयात एसएलआर रायफलद्वारे स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली,

अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. साळी त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button