हाफकिन संस्थेने लस विकसित करण्यावर जास्त भर द्यावा –आरोग्यशिक्षणमंत्री अमित देशमुख
![Congress Minister's Theater Experiment Supervision Board](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Amit-deshmukh.jpg)
मुंबई – राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. या कोरोना काळात हाफकिन संस्थेने लस विकसित करण्यावर भर द्यावा आणि हे आव्हान पेलण्यासाठी बदल सुचवणारा आराखडा तीन आठवडयात सादर करण्याचे आदेश आरोग्यशिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. राज्यातील परिस्थिती लक्षात घेता संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल (२३ सप्टेंबर) दिले आहेत.
काल मंत्रालयात हाफकिन संस्थेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, हाफकिनच्या संचालक शैला ए यांच्यासह हाफकिन संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. अमित देशमुख म्हणाले की, हाफकिन संस्थेने सध्याची राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता, तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक भर देणे आवश्यक आहे. हाफकिन संस्थेने आजपर्यंत कॉलरा, रेबीज, सर्पदंश, विंचूदंश अशा अनेक रोगप्रतिबंधक लसी शोधून काढल्या आहेत.