स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार, दानवेंचा टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Raosaheb-danve-696x447.jpg)
औरंगाबाद | “महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचं स्टिअरिंग हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. तर तिसरा पार्टनर मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असं सांगत आहे. दोघांच्या हातात स्टिअरिंग असल्यामुळे ही गाडी झाडावर आदळणार आहे”, असा टोला भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल (30 जुलै) पुण्याचा दौऱ्यादरम्यान स्टिअरिंगवरील दोन्ही हात सोडून, चालत्या गाडीतून हात जोडून नमस्कार करताना पाहायला मिळाले. यावरुन भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी टीका केली.
गाडी एक आणि चालवनारे दोन आहेत, स्टिअरिंग दोघांच्या हातात आहे. त्यामुळे राज्याच्या करभाराचे स्टिअरिंगन एकाच्या हातात असलं पाहिजे. स्टिरिंगनमधील हात निसटला तर कधी अपघात होऊ शकतो”, असं दानवे म्हणाले. त्याचबरोबर “त्यांच्याकडे लायसन्स आणि इन्शुरन्सही नाही”, अशी मिश्किल टिप्पणीदेथील रावसाहेब दानवेंनी यावेळी केली. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. “पावसात भाषण केल्याने चांगलं यश मिळतं”, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.