सोशल मीडियावर ‘लाचार सेना’ ‘युती’वरून नेटक-यांनी केले ट्रोल!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/sena1-300x185-1.jpg)
– सोशल मीडियावर ‘लाचार सेना’ ट्रेंडिंग
मुंबई – शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी 25 वर्षात युतीत सडलो, आता ‘काही झालं तरी युती करणार नाही’ अशी घोषणा करता करता अखेर शिवसेना-भाजपाने युती केली. मागील साडेचार वर्षात शिवसेनेने कायम सत्तेचा मलिदा लाटत भाजपच्या धोरणावर टीका केली. सत्तेत असूनही आम्ही तुमच्यासाठी काम करतोय, असे भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांनी हातमिळवणी करण्याची अधिकृत घोषणा केल्यावर, एव्हाना करण्याआधीच, नेटक-यांनी शिवसेनेला चांगलेच ट्रोल केले आहे. ‘निवडणुकीसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली’ अशा कमेंटस करत हॅशटॅग ‘लाचार सेना’ वापरत अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
गेल्या साडे चार वर्षांपासून सतत एकमेकांवर टीका करणा-या शिवसेनेने भाजपाशी युती केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. भाजपाशी युती करताच शिवसेनेला ‘राजीनामा खिशात’, ‘सत्तेला लाथ मारु’ या वाक्यांची आठवण करुन देत सोशल मीडियावर टोले लगावण्यात येत आहेत. परस्परांवर टोकाची टीका आणि स्वबळावर लढण्याची गर्जना करूनही शिवसेना आणि भाजपाने निवडणुकीसाठी सोमवारी युतीची घोषणा केली.