breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

सोबत होता ‘एक्का’ म्हणून विजय झाला पक्का, भोसरीतल्या दोन ‘दादां’ची प्रथमच गळाभेट !

  • पक्षनेते एकनाथ पवार यांच्या वाढदिवसाचा साधला योग
  • आमदार महेश लांडगे यांनी दिल्या मनपूर्वक शुभेच्छा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना पक्षाकडे उमेदवारीसाठी हट्ट न धरता पक्ष देईल त्या उमेदवाराचे निष्ठेने काम करण्याची भूमिका घेणारे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहरातले नेते एकनाथ पवार यांनी भोसरी मतदार संघात आमदार महेश लांडगे यांना खंबीर साथ दिली. त्यांच्या कार्याचे महत्व पटल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासत एकनाथ पवार यांना स्वतःच्या कार्यालयात बोलाऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून आनंदोत्सव (विजयोत्सव) साजरा केला.

मागच्या पंचवार्षिकीमध्ये आमदार महेश लांडगे हे अपक्ष निवडून आले होते. राज्यातील भाजपशी संलग्न राहून त्यांनी पाच वर्षे काम केले. 2017 ला पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आली. अशातच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप ज्यांनी टिकवली, वाढवली असे भाजपचे कट्टर कार्यकर्ते एकनाथ पवार यांना महापालिकेतील पक्षनेते पदावर स्थान मिळाले. त्यांचे भोसरी मतदार संघात चांगले प्रस्थ असल्यामुळे आमदार महेश लांडगे यांनी गेल्या पाच वर्षात पवार यांना केवळ प्रतिस्पर्धक म्हणूनच पाहिले. त्यामुळे दोघांमध्ये एक प्रकरचा दरावा निर्माण झाला होता.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार सहज पक्षाचे तिकीट मिळवू शकले असते. कारण, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, स्मृती ईराणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. शिवाय पवार हे संघाच्या पठडीतले असल्यामुळे त्यांना पक्षाने प्रथम पसंती दिली असती. परंतु, त्यांनी तसे न करता पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करण्याची भूमिका ठेवून मनाचा मोठेपणा दाखविला. निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिलेले आमदार महेश लांडगे यांचे पवार यांनी निष्ठेने काम केले. आज आमदार लांडगे पुन्हा विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयामध्ये एकनाथ पवार यांचे बहुमुल्य योगदान आहे. पवार यांनी केलेल्या कार्याचे महत्व पटल्यामुळे आमदार लांडगे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

भोसरीतले दोन ‘दादा’ एकत्र

आज शुक्रवार (दि. 25) असून एकनाथ पवार यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आमदार महेश दादांनी एकनाथ दादांना निमंत्रित केले होते. निमंत्रणाचा मान राखून पवार यांनी सुध्दा आमदार लांडगे यांच्या कार्यालयात उपस्थिती लावली. लांडगे यांनी पवार यांच्या हस्ते केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एकनाथ दादांनी सुध्दा त्यांचा विजय झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. माझ्या विजयामध्ये तुमच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे योगदान असल्याची भावना व्यक्त करत महेश दादांनी मनाचा मोठेपणा राखला. मात्र, गेल्या पाच वर्षात समज गैरसमज वाढत गेल्यामुळे दोघांमध्ये दुरावा होता. त्यामुळे आमदारांच्या कार्यालयात जाण्याची एकनाथ दादांची ही पहिलीच वेळ आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर दोन दादांनी एकमेकांना सुभेच्छा देण्याचा योग जुळून आल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button