breaking-newsमहाराष्ट्र
सोनू सूदने पोलिसांना दिले २५,००० फेस शिल्ड, गृहमंत्र्यांनी मानले आभार !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/EdDL0MqUwAEyCwo-1.jpg)
मुंबई : राज्यात कोरोनाच्या या संकट काळात पोलीस जीवाची बाजी लावत रात्रंदिवस आपली कामगिरी चोख बजावत आहेत. सध्या लोकांनी विनाकारण बाहेर फिरू नये यासाठी पोलिस कारवाई देखील करत आहेत. मात्र, काही पोलीस बांधव देखील कोरोनाच्या आजारापासून लढत आहेत. काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली त्यातून ते बरे हौने घरी गेले तर काही पोलिसांना जीव देखील गमवावा लागला.
या सर्व काळात बॉलिवुड अभिनेता सोनू सूद याने मजुरांसाठी स्वखर्चाने त्यांना आपल्या राज्यात पाठवले. पुन्हा एकदा सोन सूद याने निःस्वारथ मदतीचा हात पोलिसांना दिला आहे. सोनू सूद याने २५,००० फेस शिल्ड पोलिसांना दिले आहेत. याबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोनू सुद याचे आभार मानले आहेत.