breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुरक्षारक्षकानेच केली न्यायाधीशाच्या पत्नीची हत्या; मुलगा गंभीर

गुरुग्राम : गुरुग्राममध्ये न्यायाधीशांच्या पत्नीवर आणि मुलावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत न्यायाधीशांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे. गोळीबार झाल्यावर उपचारासाठी त्या दोघांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काल (ता. 13) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास न्यायाधीशांच्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गुरुग्राममधील मिलेनियम सिटी सेक्टर-49 मधील आर्केडिया मार्केटमध्ये सायंकाळच्या सुमारास सत्र न्यायाधीशांच्या बंदूकधारी सुरक्षारक्षकाने त्यांच्या पत्नी आणि मुलांवर गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या पत्नीला 2 तर मुलाला 3 गोळ्या लागल्या. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला.

दरम्यान, सुरक्षारक्षक आरोपी महिपाल गुडगांव न्यायालयातील न्यायाधीशांच्या पत्नीला (वय 37) आणि मुलाला (वय 17) घेऊन मार्केटमध्ये गेला होता. यावेळी पत्नी आणि मुलगा गाडीतून उतरल्याबरोबर त्याने या दोघांवर गोळीबार केला. आरोपीच्या हातामध्ये बंदूक असल्याने मार्केटमधील कोणीही आरोपीच्या जवळ जाण्याचे धाडस केले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पोलिस पुढील चौकशी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button