breaking-newsमहाराष्ट्र

सीबीएसईचा आज निकाल जाहीर करण्याची शक्यता

नवी दिल्ली : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचा निकाल सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) जाहीर करण्याची शक्यता आहे. यंदा सुमारे 13 लाख विद्यार्थ्यांनी 6 मे रोजी NEET ची परीक्षा दिली होती.

परीक्षार्थी सीबीएसईच्या cbseneet.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात. याआधी सीबीएसईने 27 मे रोजी NEET 2018 ची ‘आन्सर की’ जाहीर केली होती. त्याचबरोबर, 27 मे पर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.

तज्ज्ञांच्या मते, यंदा परीक्षा मुळातच कठीण होती, त्यामुळे कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे. परीक्षेत मिळवलेल्या गुणांवर परीक्षार्थींची ऑल इंडिया मेरिट लिस्ट ठरवली जाईल. सीबीएसई सर्व परीक्षार्थ्यांची वेगवेगळी रँकसुद्धा घोषित करेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button