breaking-newsपुणेमहाराष्ट्र
सिंहगड एक्स्प्रेसला रोज उशीर, संतप्त प्रवाशांचा रेल्वे अधिकाऱ्याला घेराव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Lonawala.jpg)
सिंहगड एक्सप्रेसला दररोज उशीर होत असल्याने आज सकाळी लोणावळा रेल्वे स्थानकात संबंधित रेल्वे प्रशासनाला जाब विचारत प्रवाशांनी अधिकाऱ्याला घेराव घातला होता. सिंहगड एक्सप्रेस पुण्यातून सुटल्यानंतर लोणावळ्यात वेळेवर पोहचते, परंतु पुढे जात असताना मात्र या गाडीला किमान ४० मिनिटं उशीर होतो असा आरोप प्रवाशांंनी केला असून त्याचे उत्तर द्या असे म्हणत रेल्वे अधिकाऱ्याला घेराव घालण्यात आला.