breaking-newsपुणेमहाराष्ट्र

सावधान ! एटीएम कार्ड 31 डिसेंबरला होणार बंद

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 27 ऑगस्ट 2015 रोजी मॅग्नेटिक स्ट्राइप असणारी सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यात येतील यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले होते. यामुळे ग्राहकांचे जुनी एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरला बंद होणार असून ग्राहकांना ते बदलून घेण्याचे सूचना आरबीआयने दिले आहेत. यामुळे येत्या 31 डिसेंबरला जुनी एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड असणारी सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यात येतील.

याबाबत सर्व बँकांनी आपल्या जुनी एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड ग्राहकांना बदलून ईएमव्ही (EMV) म्हणजेच युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा चिप बेस्ड कार्ड द्यावे, असे सांगितले होते. तसेच ईएमव्ही चिप बेस्ड कार्डसाठी अर्ज केला नसेल, तर 31 डिसेंबरपूर्वी करणें अनिवार्य आहे. ग्राहकांनी मुदतीपूर्वी आपले जुने मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड बदलून घेतले नाही, तर ग्राहकांना त्यांचे एटीएम व्यवहार करता येणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे ईएमव्ही बेस्ड कार्डसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button