Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल – बच्चू कडू
![When you dare to start school, you have to think - Bachchu Kadu](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/bachhu-kadu.jpg)
कराड : राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवावर मजा करणाऱ्या सरकारला कर्जमाफी दयावीच लागेल, असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. प्रांतवाद न करता सर्वाना समान न्यायाने सबसिडी दयावी अन्यथा शेतकऱ्यांचा आसूड मंत्र्यावर चालवावा लागेल असा इशारादेखील बच्चु कडू यानी दिला. ते कराडमध्ये बोलत होते. सीएम ते पीएम आसुड यात्रेचे सातारा जिल्ह्यात कराड येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांची उपस्थिती होती. दरम्यान,शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ही आसुड यात्रा काढण्यात आली आहे.