breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती केल्या निश्चित

मुंबई – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटाझरच्या वाढत्या किंमतीविरोधात कडक पाऊल उचलत त्यांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी शुक्रवारी ट्विट करत ही माहिती दिली. २०० मिली सॅनिटायझरची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही. तसंच त्यांनी मास्कची किंमत देखील निश्चित करण्यात आली असल्याचे सांगितले

राम विलास पासवान यांनी सांगितले की, ‘कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून बाजारात विविध प्रकारचे मास्क, तसंच त्याच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि सॅनिटायझरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सरकारने याला गांभिर्याने घेत त्यांच्या किमती निश्चित केल्या आहेत.’ सरकारने मास्कच्या निश्चित केलेल्या किमतीबाबत पासवान यांनी सांगितले की, ‘अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत २ आणि ३ प्लाय मास्कमध्ये वापरल्या जाणाऱ्या कपड्याची किंमत १२ फेब्रुवारी २०२० रोजी जशी होती तशीच राहतील.’ तसंच त्यांनी २ प्लाय मास्कची किरकोळ किंमत ८ रुपये आणि ३ प्लाय मास्कची किंमत १० रुपयांपेक्षा जास्त असणार नाही, असे देखील सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button