breaking-newsमहाराष्ट्र

सरकारने परवानगी दिली नाही तरीही २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार- इम्तियाज जलील

औरंगाबाद – औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील मशिदी उघडण्याच्या मुद्यावरून थेट राज्य सरकारलाच आव्हान दिले आहे. जर सरकारने परवानगी दिली नाही तरीही २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचे खासदार जलील यांनी म्हटले आहे.

खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, १ सप्टेंबरला गणपती विसर्जन आहे. हिंदू बांधवांसाठी खूप महत्त्वाच्या असलेल्या या दिवशी सरकारने राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी आणि मग २ सप्टेंबरपासून आम्ही आमच्या मशिदी उघडू. आम्ही आमच्यावतीने हा अल्टिमेटम देत आहोत. जर सरकारकडे राज्यातील प्रार्थनास्थळे उघडू न देण्यासाठी काही ठोस कारण किंवा योग्य तर्क असतील तर आम्ही ते निश्चितपणे ऐकून घेऊ अन्यथा परवानगी दिली नाही तरीही आम्ही २ सप्टेंबरपासून मशिदी उघडणारच आणि याची सुरुवात आम्ही औरंगाबादमधून करणार, असे आव्हानच जलील यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button