Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पोलीस तक्रार प्राधिकरण बरखास्तीच्या मार्गावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/f7535474-6443-11e8-b4a9-2154dcd09999.jpg)
मुंबई । महाईन्यूज
पोलिसांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी कार्यरत असलेलं पोलीस तक्रार प्राधिकरण सध्या बरखास्त होण्याच्या मार्गावर आहे. न्यायपीठावरील अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक नसल्यामुळे 1 जानेवारीपासून प्राधिकरणाचे कामकाज पूर्णपणे ठप्प आहे.
गेली दीड महिना राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यानंतर खातेवाटपाच्या घडामोडींमध्ये राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणकडे सरकारचं दुर्लक्ष झालं आहे. 1 जानेवारीपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. लवकरात लवकर या नियुक्त्या व्हाव्यात अशा पद्धतीचा पत्रव्यवहार याआधी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडून राज्य सरकारला केला आहे. त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.