समृद्धी महामार्गाच्या बाजूने धावणार मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन
![Mumbai-Hyderabad bullet train will run from 6 talukas of Solapur district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/bullet-train-l-.jpg)
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या बाजूने आता याच दोन्ही शहरांदरम्यान बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाने तशी योजना तयार केली असून, समृद्धी महामार्गासोबतच या बुलेट ट्रेनसाठीही भूसंपादन करण्याचा विचार असून यासाठी स्पेनच्या इन्को या कंपनीचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास दोन वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेसाठी केलेला हा पहिला एकत्रित प्रकल्प ठरेल.
नागपूर-मुंबई वाहतूक कालावधी आठ तासांनी कमी करणारा ‘कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’ समृद्धी महामार्ग निर्माण होत आहे. ७१० किमी लांबीच्या या महामार्गाच्या बाजूने ‘बुलेट ट्रेन’ धावू शकते. रेल्वे खाते आणि रस्ते वाहतूक खाते मिळून यासंदर्भात काम करत आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करतानाच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचाही विचार करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.