‘सगळे पैलवान चालले; या वयातही एकटं प्रचाराला फिरावं लागतंय’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/iesclipboard01_201910313135.jpg)
बारामती – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटच्या टप्प्यात रंग चढू लागला आहे. बारामती या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. शरद पवार म्हणतात मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, मी पैलवान तयार करतो पण सगळे पैलवान तुम्हाला सोडून का चाललेत? कोणी तुमच्यासोबत राहायला तयार नाही. या वयातही तुम्हाला महाराष्ट्रभर फिरावं लागतंय मग कसले पैलवान तुम्ही तयार केलेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी राहायला तयार नाही, शरद पवारांची अवस्था शोल सिनेमातील जेलरसारखी झाली आहे. अर्धे इथे जा, अर्धे तिथे जा बाकीचे मागे या, पण मागे कोणी उरलेच नाही. तुमचे पैलवान दिसत नाही. गेल्या निवडणुकीत ४१ निवडून आले या निवडणुकीत २० आकडाही पार करु शकणार नाही असं त्यांनी सांगितले.