शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे सरसकट ‘फसवणूक’, – आशिष शेलार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/23.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्याचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा ठाकरे सरकारने केली. मात्र, प्रत्यक्षात शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झाल्यावर ती फसवी आहे, एवढेच नव्हे तर ती राज्यातील शेतकऱ्याचे सरसकट फसवणूक आहे, असा आरोप भाजप नेते आमदार अॅड.आशिष शेलार यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिलेली कर्जमाफी ही 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परत फेड न झालेली रक्कम 2 लाखांपर्यंत आहे. एवढीच मर्यादित आहे. त्यामुळे ती सरसकट ठरत नाही. ती किमान 30 ऑक्टोबर 2019 तरी असयला हवी होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2001 पासून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राबविली होती. या योजनेमध्ये सुमारे 54 लाख शेतकरी लाभार्थी ठरले होते त्यामुळे नव्या योजनेत शेतकरी किती लाभार्थी ठरतील? याबाबत शंका आहे, म्हणून ही योजना सरसकट आहे, असे म्हणता येणार नाही. ही ‘सरसकट’ फसवणूक असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.