शेतकरी संघटनांची 1 ऑगस्टला बंदची हाक…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-51.jpg)
राज्यात दूधाचा दर वाढवावा या प्रश्नासाठी शेतकरी संघटनांनी 1 ऑगस्टला बंदची हाक दिली आहे. त्याचा इशारा म्हणून आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. दूध भावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आजपासून सुरवात झाली. राज्यभर दगडाला दुग्धाभिषेक करण्यात येत आहे. पाषाण हृदयी सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. नगर, कोल्हापूर व सांगलीतही आंदोलन सुरू झाल्याची माहिती शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिली.
राज्यभर दूध दराचा प्रश्न पेटला आहे. एक ऑगस्टला शेतकरी संघटनांनी बंदची हाक दिली आहे. त्यापूर्वी इशारा देणारी आंदोलने सुरू झाली आहेत. नगर जिल्ह्यात अकोले येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली. दुधाला प्रति लीटर ३० रुपये भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर आले आहेत. ठिकठिकाणी दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र व राज्य सरकारचा शेतकऱ्यांनी करण्यात आला.
यापुढे दररोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर दहा रुपये अनुदान जमा करावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.