‘शुन्याचे शंभर करण्याची आपल्यात धमक’, जयंत पाटलांचे वक्तव्य
यवतमाळ – राष्ट्रवादी काँग्रेसची ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौरा यात्रा नवव्या दिवशी यवतमाळमध्ये पोहचली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठक घेतली होती. मी पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आलो आहे, आपल्या सर्वांना मिळून पक्षाची मजबूत बांधणी करायची आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
वाचा ;-नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज; संजय राऊतांचा दुजोरा
जे खरं आहे ते स्वीकारून शुन्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवली आहे. शरद पवार यांच्या विचारांचा हा पक्ष आहे. त्यामुळे एकजुटीने पक्ष वाढविण्यासाठी कामाला लागा, असा निर्धार जयंत पाटलांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत व्यक्त केला.
जे खरं आहे ते स्वीकारून शुन्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवली आहे. आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या विचारांचा हा पक्ष आहे. त्यामुळे एकजुटीने पक्ष वाढविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन ना. @Jayant_R_Patil यांनी कार्यकर्त्यांना केले. #RashtravadiPariwarSanvad #राष्ट्रवादीपरिवारसंवाद pic.twitter.com/inkBgZn1ie
— NCP (@NCPspeaks) February 5, 2021
या बैठकीला जिल्हाध्यक्ष व माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदिप बाजोरिया, आमदार इंद्रनील नाईक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन देखील भेट घेतली.