breaking-newsमहाराष्ट्र
शिवसेनेला धक्का, भाजपचे राजेंद्र गावित विजयी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/vanga-and-gavit-.jpg)
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांनी पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली. आरोप प्रत्यारोप करत प्रचाराच्या तोफा डागल्या. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे मतदारसंघात पोटनिवडणुक झाली. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित राजेंद्र गावित यांनी 44 हजार 500 मतांनी विजय मिळवला आहे. गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना पराभूत केले.
आज सकाळी पहिल्या राऊंडपासूनच भाजपच्या राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. अखेर त्यांनी विजय खेचून आणला आहे. शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांनीही भाजपला काँटे की टक्कर दिली. बहुजन विकास आघाडी (बाविआ) ने सुद्धा चांगली मते खेचली. मात्र, त्यांना तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.