शिवसेनेच्या खासदारानेच केली शिवसेना उमेदवाराची पोलिसात तक्रार, निंबाळकरांविरुध्द गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/omraje.jpg)
उस्मानाबाद – शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट केल्यानंतर उस्मानाबादेत वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना लोकसभा उमेदवार ओमराजे निंबाळकारांविरोधात व्हायरल क्लीपप्रकरणी गायकवाडांनी तक्रार दिली. तक्रारीनंतर निंबाळकरांविरोधात उमरगा पोलिसात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
निंबाळकर यांच्या व्हायरल क्लीपप्रकरणी खासदार गायकवाड यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या क्लीपमध्ये ओमराजे यांनी अश्लील भाषा वापरून शिवीगाळ आणि चारित्र्य हनन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. गुरुवारी दुस-या टप्प्याचा मतदान होणार आहे. त्यामध्ये उस्मानाबाद मतदारसंघाचाही समावेश आहे. अशा सर्व परिस्थितीत निंबाळकरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
मातोश्रीवरून तिकीट कापल्यामुळे गायकवाड शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर नाराज आहेत. गायकवाड समर्थक शिवसेना उमेदवार ओमराजे यांचा पराभव करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशीही चर्चा सुरु होती. त्यामध्ये आता हा वाद तिकीट दिले आहे. त्यामुळे गायकवाड नाराज आहेत. तेव्हापासून उस्मानाबादमधील शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणाजगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गायवाड विरुद्ध निंबाळकर या वादाचा फायदा राणा जगजीत सिंह पाटील यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस महाआघाडीसाठी ही लढाई सोपी झाली आहे. मात्र निंबाळकर विरूध्द गायकवाड वादामुळे शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.