breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना खासदाराकडून वाहतूक नियम धाब्यावर, कारवाई कोण करणार?

उस्मानाबाद : येथील राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओंबराजे निंबाळकर यांच्यातील पारंपरिक वादामुळे कायमच चर्चेत राहिलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांच्या करामती समोर येऊ लागल्या आहेत. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर बुलेट गाडीवरून चक्क ट्रीपल सीट जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाहतूक नियमांची ‘ऐशी की तैशी’ करणा-या या खासदारावर कोण कारवाई करणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उस्मानाबाद मतदार संघातून शिवसेनेकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांचे समर्थक कैलास पाटील हे उमेदवार आहेत. पाटील यांच्यासाठी ओमराजे गावोगावी जाऊन प्रचार करीत आहेत. मात्र, नुकतंच ओमराजे यांचं ट्रिपल सीट बसून बाईकवर प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाहतुकीचे नियम हे फक्त सामान्यांसाठीच असतात का, असा प्रश्न सध्या हा व्हिडीओ व्हायरल करत उस्मानाबाद जिल्ह्यातील सामान्य लोक विचारत आहेत.

स्वतः खासदारांनी ट्रिपल सीट गाडीवर बसवून वाहतुकीचे नियम तोडल्यावर चालतात. सामान्य माणसाने हेल्मेट घालून गाडी चालवली नाही, तर त्याच्यावर लगेच पोलीस कारवाई करतात. आता या खासदाराला पोलीस दंड ठोठावणार का, असा प्रश्न उस्मानाबादमधील नागरिकांनी विचारला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button