breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

शिक्षक आणि विद्यार्थ्यांना यावर्षी दिवाळीची सुट्टी केवळ ५ दिवस

मुंबई – शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिवाळीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवाळीच्या सुट्या १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत देण्यात येणार असून दिवाळीच्या सणाला ५ दिवस ऑनलाइन वर्गातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विश्रांती मिळणार आहे. मात्र, दरवर्षी १८ ते २० दिवस देण्यात येणाऱ्या शाळांच्या दिवाळीच्या सुट्या फक्त ५ दिवस देण्यात आल्याने शिक्षक व शिक्षक संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

शिक्षक ऑनलाइन प्रशिक्षण घेऊन ऑनलाइन शिक्षण देत असताना अनेक ठिकाणी गरज असेल तिथे लॉकडाऊनमध्ये कोविड ड्युटीसाठी सुद्धा हातभार लावला असताना शिक्षकांना फक्त ५ दिवस सुट्या? या सुट्या वाढवून मिळायला हव्या अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली असून या निर्णयावर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनामुळे जूनपासून शाळा बंद असून सगळीकडे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक ऑनलाइन शिक्षण देऊन अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. त्यामध्ये अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करता यावा, यासाठी यावर्षी कमी सुट्या शिक्षकांना दिल्या गेल्या आहेत. पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आणखी काही दिवस वाढवून सुट्या मिळायला हव्यात असा शिक्षकांचा सूर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button