breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

शरद पवारांना मोदी गुरु मानतात; पवारांना समजून घ्यायला या लोकांना 100 जन्म लागतील – संजय राऊत

मुंबई : महाईन्यूज 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर टिकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गुरु मानतात. हे या लोकांनी लक्षात घ्यावं. पवार साहेबांना समजून घेण्यासाठी भाजपवाल्यांना 100 जन्म लागतील, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

राऊत म्हणाले की, “सरकारं स्थापन करण्यासाठी अनेकदा जास्त कालावधी लागलेला आहे. भाजपचं सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये तर चार-चार, पाच-पाच महिने वेळ लागला आहे. हा जो काही गोंधळ आहे तो माध्यमांच्या मनात असू शकेन. ज्यांनी गोंधळ निर्माण करायचा आहे हे ठरवलंच आहे, राज्यात स्थिर सरकार येऊ नये असं ज्याने ठरवलं आहे, त्यांना हा पेच किंवा गोंधळ वाटत असेन. त्यामुळेच ते तशाप्रकारच्या बातम्या पसरवत असतील. शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांना गुरु मानतात. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत जात आहोत असं म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावं. शरद पवार समजून घ्यायला या लोकांना 100 जन्म लागतील. शरद पवार यांचा समाजकारण आणि राजकारणातील अनुभव मोठा आहे. त्यामुळे ते जे बोलत आहेत ते बरोबरच आहे. शरद पवार यांना विरोधात बसण्याचंच जनमत मिळालं आहे आणि आम्ही स्वतंत्र लढलो आहे. मात्र, आता स्थिर सरकारसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button