breaking-newsमहाराष्ट्र

शबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश करुन घेतलं दर्शन ; शुध्दीकरणासाठी मंदिर बंदचा प्रशासनाचा निर्णय

तिरुअनंतपूरम : केरळमधील शबरीमाला मंदिरात आज ऐतिहासिक घटना घडली. सुमारे 40 वर्षीय दोन महिलांनी बंदी झुगारुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन दर्शन घेतलं. बिंदू आणि कनकदुर्गा या क्रांतीकारी महिलांनी मध्यरात्रीपासून मंदिराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पहाटे 3.45 च्या सुमारास मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. या महिलांसोबत काही पोलीस आणि अधिकारी होते. मात्र महिलांनी मंदिर प्रवेश करताच मंदिर प्रशासनाने शुद्धीकरणासाठी मंदिर बंद केलं.

सुप्रीम कोर्टानं आदेश देऊनही महिलांना शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. महिलांना या मंदिरामध्ये शेकडो वर्षांपासून बंदी आहे. पण ही बंदी अन्यायकारक आणि भेदभाव करणारी असल्याचं सुप्रीम कोर्टानं दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. मात्र स्थानिक आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळं या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. अनेक महिलांनी प्रवेशाचा प्रयत्न केला, पण त्यांना वेळोवेळी रोखण्यात आलं.तिथल्या राज्य सरकारनं पोलीस बंदोबस्त ठेवून महिलांना मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला. पण तोही असफल झाला. मंदिर प्रशासनानं विरोधाची भूमिका कायम ठेवल्यामुळं आणि हिंदुत्वावाद्यांच्या आक्रमकतेमुळं सरकारला जबरदस्ती करण्यातही अडचणी आल्या.पण आज हे सारं गळून पडलं. पहाटे पावणे चार वाजता क्रांती घडली आणि दोन महिलांनी मंदिरात प्रवेश केला.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय होता?

शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशबंदीप्रकरणी 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. त्यानुसार शबरीमाला मंदिरात कोणत्याही वयाच्या महिलेला प्रवेशापासून रोखू शकत नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिला होता. 4 न्यायमूर्ती बाजूने 1 न्यायमूर्तीचा विरोधात निर्णय होता. त्यामुळे बहुमताने महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय झाला होता. महिला न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी महिलांना शबरीमाला मंदिर प्रवेश देण्यास विरोध केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button