वीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/money-672x420-1.jpg)
मुंबई – राज्य सरकारी कर्मचा-यांना दिवाळीच्या तोंडावरच महागाई भत्त्याची थकबाकी दिली जाणार असतानाच आता वीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड जाणार आहे. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त15 हजार रुपये तर या तीन्ही कंपन्यातील विद्युत सहायक यांना नऊ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत सर्वानुमते महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.