breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांना मिळाला दिलासा

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या क्वारंटाईन सेंटर मधील रुग्णांची हालपेष्ट होत असताना व पालिका प्रशासनाकडून रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी अचानक दहिसर- बोरिवली येथील क्वारंटाईन सेंटर ला भेट दिली. तसेच अन्य ठिकाणच्या क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांना भेडसावणा-या समस्यांसंदर्भात मुंबईचे महापालिका आयुक्त चहल यांच्याशी संर्पक साधला व त्यांनी तेथील पालिका वॉर्ड अधिका-यांना समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यानुसार वॉर्ड अधिका-यांनी तेथील सेंटरमध्ये कार्यवाही केली. विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या या भेटीमुळे व आयुक्तस्तरावरुन पाठपुरावा करुन सेंटरमधील समस्यांचे निराकारण केल्यामुळे क्वारंटाईन सेंटर मधील अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. त्यापैकी काही रुग्णांनी फेसबुक सारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून दरेकर यांचे आभारही मानले.

क्वाराटांईनला सेंटर ला देरकर यांनी भेट दिल्याचे वृत्त सोशल मिडियामध्ये वायरल झाल्यानंतर मुंबईतील विविध ठिकाणच्या क्वारंटाईन सेंटर मधून तेथील समस्यांबाबत विरोधी पक्ष नेते दरेकर यांना रुग्णांचे फोन आले. कोणाला जेवण वेळेवर मिळत नव्हते तर काही रुग्णांना औषध मिळत नव्हते, काही ठिकणी लिफ्टची समस्या होती, काही रुग्णांवर अक्षरश उपासमारीची वेळ आली होती. अश्याच विविध समस्या सायन येथील सरदार नगर रावळी कॅम्प, अँन्टॉप हिल वडाळा मधील क्वारंटाईन सेंटर व अन्य ठिकाणच्या क्वारंटाईन सेंटरमधून दरेकर यांना कळविण्यात आल्या. गेल्या आठ दिवसांपासून येथील रुग्णांची हालपेष्टा होत आहे. या गंभीर घटनांची दखल घेत दरेकर यांनी तातडीने महापालिका आयुक्त चहल यांच्याशी संर्पक साधला व सायन येथील सरदार नगर तसेच अन्य ठिकणाच्या सेंटर मधील समस्यांची माहिती त्यांना दिली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी एफ,नॉर्थ च्या पालिका वॉर्ड ऑफिसर आदेश देत तेथील समस्या सोडविण्याचे आदेश दिले.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी तातडीने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली. सरदार नगर वडाळा तसेच अन्य क्वारांटाईन सेंटर वर महापालिकेचे अधिकारी पोहोचले व त्यांनी रुग्णाच्या समस्यांचे निराकारण केले. अश्याच प्रकारे विविध भागातील पालिका अधिका-यांनी सेंटर मधील रुग्णांच्या सोडविल्या.  दरेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल तेथील रुग्णांनी त्यांचे फेसबुक च्या माध्यमातून आभार व्यक्त केले.

दहिसर-बोरिवली भागातील सौराष्ट्र पटेल हॉल, पटेल समाज हॉल, अशोकवन मॅटर्निटी होम, व रावळपाडा येथील महापालिका रुगाण्लाय, गोकुळानंद हॉटेल येथील क्वारंटाईन सेंटर ला भेट दिली. या सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांची आस्थेवाईक पणे चौकशी केली. दरेकर यांनी यावेळी तेथील रुग्णांना काही अडचणींबाबतचीही माहिती घेतली. रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची लाईन, जेवण वेळेवर देण्यात यावे आदी सूचना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी तेथे उपस्थित महापालिका अधिका-यांना दिल्या, त्यामुळे काही वेळातच यावर कार्यवाही झाली व तेथील रुग्णांना दिलासा मिळाला.

मुंबईतील विविध क्वारंटाईन सेंटर मधील रुग्णांना काही समस्या असेल व काही दुरावस्था असल्यास त्यांनी थेट विधापरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना (९८३३३२१२६३) या क्रमांकावर थेट संर्पक साधू शकता अथवा व्हॉट्स अप किंवा एसएमएस करु शकता. तसेच विरोधी पक्ष नेत्यांचे विशेष कार्य अधिकारी अतुल खानोलकर (९०२९०२४४४४) व स्वीय सहाय्यक सागर बागुल (९९८७७१२३४२) यांच्याशी सुध्दा आपण संर्पक साधू शकता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button