विनोद तावडे आणि राज ठाकरेंची ‘कृष्णकुंज’वर भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/vinod-tawde-meets-raj-thackeray-..jpg)
मुंबई : शिक्षणमंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. . मात्र चर्चेचा तपशील जरी गुलदस्त्यात असला तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
ठाण्यामध्ये नाट्यसंमेलन होणार आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी स्वत: विनोद तावडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु निमित्त जरी आमंत्रणाचं असलं तर भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे कळते.
गिरीश महाजन यांनी कालच छगन भुजबळ यांची भेट घेतली होती, तर आज तावडे आणि राज यांची भेट झाली. मुंबई आणि कोकणातील शिक्षक-पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे.