Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
विनायक जयंती निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Ganpati.jpg)
पुण्यातील महत्वाच्या गणपतींपैकी एक अशी ओळख असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आज पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. पुष्टिपती विनायक जयंतीनिमीत्त या सोहळ्याचं खास आयोजन करण्यात आलं होतं. राज्यभरात पसरलेल्या दुष्काळाचं सावट दूर होऊ दे, पाण्याचं दुर्भिक्ष कमी होऊ दे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली.