Breaking-newsमहाराष्ट्र
विधानपरिषद निकाल : परभणी- हिंगोलीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/viplav-bajoria.jpg)
परभणी : विधान परिषदेतील परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. बाजोरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव केला आहे. विधान परिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात २१ मेला मतदान झाले होते.
राज्यात २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय स्थिती बदलली असून भाजपाने स्थानिक राजकारणातही आघाडी घेतली आहे. विधान परिषद निवडणुकीत स्थानिक संस्था मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांचे नगरसेवक हे मतदार होते.