breaking-newsपुणेमहाराष्ट्र

विद्यापीठामध्ये पर्यावरण विज्ञानामधील पदवी अभ्यासक्रम

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मेलबर्न विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अर्थात आयसर यांच्या एकत्रित समन्वयामधून विद्यापीठामध्ये पर्यावरण विज्ञानामधील पदवी अभ्यासक्रम (बी.एसस्सी इन इन्व्हायरमेंटल सायन्स) सुरू करण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम सुरू होत आहे.

या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेलबर्न विद्यापीठ व आयसरमधील प्राध्यापकांकडूनही अध्यापन केले जाणार आहे. आयसरमधील प्राध्यापक थेट विद्यापीठात येऊन शिकवणार आहेत; तर मेलबर्न विद्यापीठातील प्राध्यापक ऑनलाईन पद्धतीने शिकविणार आहेत. बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र राहतील. पहिल्या दोन वर्षांत पर्यावरण विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर “कोअर सायन्स’मधील विषयांवर अधिक भर दिला जाणार आहे. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात पर्यावरण विज्ञानाशी संबंधित घटकांवर पूर्णतः लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्यात येत आहे, असे विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button