विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्र परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Untitled-24.png)
महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात महाविद्यालयाच्या परीक्षा, विद्यापीठांच्या परीक्षा सोबतच इतर स्पर्धा परीक्षा आणि सीईटी परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्षाबद्दल अनेक संभ्रम होते. मात्र आता विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षांबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यामातून संवाद साधला आहे. काही दिवसांपूर्वीच युजीसीने एक अहवाल जाहीर करत देशभरात विद्यापीठांच्या परीक्षांच्या वेळापत्रकासाठी गाईडलाईंस जारी केल्या होत्या. त्यानुसार आता हा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे.
अंतिम वर्गाची अंतिम सत्राची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेड आणि मार्क्स मेंटेन करण्यासाठी विशेष गुणपद्धती दिली जाईल. पुढील वर्षी ग्रेडिंग सुधारण्यासाठी विशेष परीक्षा पुढल्या वर्षी घेतल्या जातील. मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई विद्यापीठामध्ये ज्या परीक्षा झाल्या त्यांचे सर्वोत्तम मार्क निवडून ग्रेडिंग ठरवलं जाणार आहे. तर अंतिम वर्षाच्या परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार होईल.
सीईटी परीक्षा महाराष्ट्रात 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै महिन्यात घेतल्या जाणार आहेत. तर, सीईटीच्या युजी च्या परीक्षा 1-15 जुलै दरम्यान तर सीईटीच्या पीजी च्या परीक्षा 23-30 जुलै दरम्यान घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.विद्यार्थ्यांना काही प्रश्न असल्यास त्यांनी संबंधित विद्यापीठाशी बोलावे. असे आवाहन करण्यात आलं आहे.