breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

विकासकामांसाठी आमदार मानसिंग नाईक सुसाट; बैठकांचा सपाटा

इस्लामपूर| महाईन्यूज | प्रतिनिधी

वाळवा तालुक्यात असलेल्या पण शिराळा विधानसभा मतदार संघातील गावांतील विविध विकासकामांबाबत आमदार मानसिंग नाईक यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्या, लोकांना कामे प्रत्यक्षात दिसली पाहिजेत, अशा सूचना आ. नाईक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

वाळवा तालुक्यातील पण शिराळा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या गावांतील विकासकामांबाबत आ. नाईक यांनी गुरुवारी बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, वाळवा तालुक्याच्या सभापती शुभांगी पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, पंचायत समिती सदस्य शंकर चव्हाण, आनंदराव पाटील, पी. टी. पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सहाय्यक गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी स्वागत केले. या वेळी तालुका कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, राज्य परिवहन, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, पाटबंधारे विभाग, पंचायत समिती बांधकाम, छोटे पाटबंधारे विभाग, विभाग, पाणी पुरवठा, महिला व बाल विकास, रोजगार, कृषी आदी विभागांचा अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील कामांचा आढाव दिला. नागरिकांनी केलेल्या विविध मागण्या व अडचणी, सुरू असलेल्या कामातील अडचणी, नवीन कामे आदीं बाबत सविस्तरपणे चर्चा झाली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button